Friday, May 16, 2008

AASHADHI EKADASHI

BRIJESH

आज आषाढी एकादशी
सर्व वरण-भात भक्तांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा !!!ह्या शुभेच्छा "हार्दिक" तेव्हाच असतील, जेव्हा तुम्ही सर्वांनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली असेल..!! तेव्हा " शास्त्रासाठी " का होईना, पण एखादी डिश तर खायलाच हवी ना..! बाकी, मग भले तुम्ही त्या डिश मधे किंवा आजुबाजुला खिचडी ला " सोबत " करु पहाणार्‍या त्या सग्गळ्या पदार्थांकडे भक्ति, आवड-निवड, प्रकृती, हवामान इ. निकष लावून दुर्लक्ष करणारच असाल तर श्री विठ्ठलाची त्याला अजिबात हरकत नाही. पण सर्वांनाच हे जमते किंवा मानवतेच , असं नाही ना..! पण असं माना कि, खिचडी हे साक्षात विठ्ठलाचे रुप आहे आणि खिचडीच्या सोबतचे पदार्थ म्हणजे समस्त संतमंडळी !!..अशी निव्वळ कल्पना तर करुन पहा, अहो, मग पहाच भक्तिगजर होतो ते.. !!ह्या सगळ्या भक्तिरसात असं मन (पोट) भरुन न्हाऊन निघाल्यावर आपोआप तुमच्या तोंडी "श्रीहरी श्री हरी" हे बोल येणारच ह्याची खात्री तर श्री विठ्ठलाला सुद्धा आहे.

aho.. Upawaas , ha shabd ch muli amhaa Haribhaktanna amaanya ahe na..! ha shabda nehmi ch amchya bhakti-maargaat adsar mhanun yet rahilaa ahe..pan amhi tyachi tamaa na balagataa amchi "upaasana" ( kinva upaas naa !) chalu ch thewato .. !! बोला मग..पुंडलिकावरदे हरीविठ्ठल..! श्री ज्ञानदेव तुकाराम..!! पंढरीनाथ महाराज की ज्जय .. !!!

BANJUTAI
ब्रिजेश्वर महाराज की जय हो !!!
असे गुरु सर्वन्ना लाभोत !!!!जय विठोबा, जय पोटोबा !!!

No comments: